12 वर्षांनी गुरूचं होतंय या राशीत संक्रमण; या 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल
ग्रहांमध्ये सर्वात प्रभावशाली मानल्या जाणार्या 2 राशींमध्ये शनी आणि गुरू यांचा समावेश आहे.
गुरू हा संथ गतीने जाणारा ग्रह आहे, असे म्हटले जाते. परंतु, त्याचे परिणाम तीव्र आणि शक्तिशाली असतात.
गुरू ग्रह 12 वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश करत आहेत. या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होणार याविषयी पाहुया.
सर्व ग्रहांमध्ये गुरु हा एकमेव ग्रह आहे ज्याचा प्रभाव अत्यंत सकारात्मक आणि शुभ मानला जातो.
गुरूच्या मार्गक्रमणातून भाग्य, धार्मिक कार्य, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती दिसून येते.
22 एप्रिल 2023 रोजी गुरू मेष राशीत प्रवेश करेल. 12 वर्षांनंतर होणाऱ्या या राशी परिवर्तनामुळे त्याचा प्रभाव खूप शुभ मानला जातो.
गुरू हा असा ग्रह आहे, ज्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे 13 महिने लागतात.
गुरू मेष राशीत भ्रमण करणार आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळतील. या राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते.
गुरूचे संक्रमण मीन राशीच्या दुसऱ्या घरात असेल. या घरातील राशीचे संक्रमण आर्थिक लाभाचे संकेत देते.
कर्क राशीच्या कर्म भावात गुरूची स्वारी येईल. या राशीच्या लोकांना उत्पन्नात वाढ होऊ शकते