काय आहे जया एकादशीचं महत्त्व; व्रत करणाऱ्याला मिळतं अश्वमेध यज्ञ करण्यासारखं पुण्य
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत केले जाते.
या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने पापांचा नाश होतो. व्यक्तीला पिशाचांपासूनही मुक्ती मिळते.
यावर्षी जया एकादशी व्रताची पूजा 01 फेब्रुवारीला सकाळी करता येईल. शुभ मुहूर्त सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आहे.
यावेळात पूजा केल्यानं तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे कार्य सफल होईल.
या वर्षीचे जया एकादशी व्रत सर्वार्थ सिद्धी योगात आहे. व्रताच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 07.10 वाजता सुरू होतो
सर्वार्थ सिद्धी योग हा शुभ परिणाम देणारा योग आहे. या योगात तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर ते यशस्वी होईल
जया एकादशीला इंद्रयोगही तयार झाला आहे. या दिवशी पहाटेपासून 11.30 वाजेपर्यंत इंद्र योग आहे.
जे लोक 01 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत करतात ते दुसऱ्या दिवशी 02 फेब्रुवारीला उपवास सोडतील.
जया एकादशीच्या दिवशी भद्रकाळाचीही छाया असते. भद्र काळात शुभ कार्य वर्ज्य असले तरी पूजा करता येते.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.