घरात पितृदोष असल्यास या 5 गोष्टींवरून कळतं

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात.

 पितृपक्षात पितरांची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी दानधर्म आणि पिंडदान केल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते.

पूर्वज नाराज असतील तर कुटुंबातील व्यक्तींच्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथी होऊ शकतात. सुखी जीवन जगण्यासाठी पितरांचे आनंदी राहणेही अत्यंत आवश्यक आहे.

भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत, पूर्वज नाराज असतील किंवा पितृदोष कसा ओळखायचा.

घरात खूप भांडणे, वाद-विवाद होत असतील, घरातील लोकांची विनाकारण भांडणे होत असतील तर पितृदोष असू शकतो.

ठरवलेल्या एखाद्या महत्त्वाच्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा मेहनत करूनही तुमच्या कामात यश येत नसेल. म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असू शकतात.

लग्न जुळत नसेल, वारंवार बोलणी बिघडत असेल किंवा वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील. तर हे पितृदोषाचे कारण असू शकते.

विविध कामांमध्ये तुमचे नुकसान होऊ लागले किंवा तुमच्या कुटुंबातील लोकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत असेल तर हे पितृदोषामुळेही होऊ शकते.

तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पितृदोष आहे, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या पितरांचे हसतमुख चित्र लावावे. हे चित्र घराच्या दक्षिण-पश्चिम भिंतीवर किंवा कोपऱ्यात लावावे.

वंदन: मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर आपल्या पितरांना नमन केलं पाहिजे आणि शक्य असल्यास फोटोला हार अर्पण करावेत.

तुम्ही पूर्वजांचे विशेष दिवस जसे की, त्यांची श्राद्ध किंवा पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. असे केल्याने पितर प्रसन्न होतात. या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करा.

(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here