हिंदू धर्मीय मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आपण झाडूच्या साहाय्याने घर स्वच्छ करतो.
झाडू कचऱ्यात असलेली अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून घराबाहेर टाकण्याचे काम करतो. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो.
वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करणे, घरात ठेवणे आणि जुन्या झाडूचे काय करावे याबाबत काही नियम सांगितले आहेत.
तुमच्या घरातील झाडू जुना झाला असेल आणि तो तुटला असेल तर तो लगेच घरातून काढून टाकावा. कारण जुना झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो.
तुटलेला झाडू वापरणे टाळा. तुटलेला खराब झालेला झाडू घरातील अडचणी वाढवण्याचे काम करतो.
घरातून जुना किंवा तुटलेला झाडू बाहेर टाकण्यासाठी सर्वात योग्य दिवस शनिवार किंवा अमावस्या मानला जातो.
ग्रहणानंतर आणि होलिका दहनानंतर घरातून तुटलेला आणि जुना झाडू काढू शकता. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा झाडूसोबत बाहेर पडते.
जुना आणि तुटलेला झाडू फेकताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्यावर कोणाचा पाय पडू शकणार नाही, अशी जागा निवडा.
जुना झाडू नाल्यात किंवा कोणत्याही झाडाजवळदेखील फेकू नका. झाडू जाळायचाही नसतो.
गुरुवार, शुक्रवार आणि एकादशीला घराबाहेर झाडू टाकू नये. त्यानं माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकटे सुरू होतात, असे मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)