25 मे रोजी अक्षय तृतियेइतका शुभ मुहूर्त 

येत्या 25 मे रोजी पुन्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. हा दुर्मिळ योग मेनंतर पुन्हा डिसेंबरमध्ये येईल.

 25 मे रोजी गुरुपुष्यामृत योगासह 5 शुभ योग तयार होत आहेत. वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवियोग देखील त्या दिवशी तयार होत आहेत.

25 मे रोजी कोणतेही शुभ कार्य, खरेदी कराल तर त्यात अनेक पटींनी वाढ होईल. या दिवशी लग्न सोडून इतर सर्व शुभ कार्ये करू शकता. 

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा दुर्लभ गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरुपुष्यामृत योगाला गुरु पुष्य नक्षत्र योग असेही म्हणतात.

25 मे रोजी सूर्योदयापासून सायंकाळी 05:54 पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी संध्याकाळी 05:54 पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होते. 

25 मे रोजी सकाळपासून 05:54 वाजेपर्यंत तुम्ही शुभ वस्तूंची खरेदी करू शकता. कोणतेही शुभ कार्य करू शकता.

या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील सकाळी 05.26 ते संध्याकाळी 05.54 पर्यंत आहे. रवियोग सकाळी 05:26 ते सायंकाळी 05:54 पर्यंत

सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगात सोने खरेदी केल्याने तुमचे धन आणि संपत्ती वाढते.

गुरु पुष्य योगात हळद खरेदी करणेदेखील शुभ आहे. देव गुरु बृहस्पती यांचा शुभ रंग पिवळा असून हळद शुभाचे प्रतीक आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here