स्वर्गासारखं सुंदर स्मशान: इथं पिकनिकला येतात लोक
स्मशानात जायची तशी अनेकांना भीती वाटते पण या स्मशानात जाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही
तब्बल 5 ते 7 कोटी रुपये या स्मशानावर लावण्यात आले आहेत. स्मशानाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे.
या स्मशानाचा प्रवेश गेट एखाद्या रिसॉर्ट किंवा पार्टी प्लॉटसारखा आहे.
स्मशानात ग्रामीण संस्कृतीसह दर्शवणारे, तसेच इतर अनेक पेटिंगही आहे
एक जुनी विहिर आहे, जिथं पाणीही साठवलं जातं.
स्मशानात स्नानघर, शौचायलासह प्रार्थनास्थळ, पुस्तकालयही आहे.
बाग, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्मारक परिसर अशा अनेक सुविधा आहेत.
स्मशानात अग्नी देण्यासाठी आधुनिक पद्धतीने जागा तयार करण्यात आली आहे.
इथं फक्त एक रुपयात अंत्यसंस्कार होतात. सामान्यपणे अंत्यसंस्कारासाठी तीन ते चार हजार रुपये घेतात.
स्मशान इतकं सुंदर आहे की इथं लोक प्री-वेडिंग फोटोशूट करायलाही येतात.
आता इतकं सुंदर स्मशान आहे कुठे तर गुजरातमध्ये. बनासकांठा जिल्ह्यातील डीसामध्ये बनास नदी काठावर हे स्मशान आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)