मुंबईतील एक लाख घंटा असलेलं अनोखं मंदिर 

मुंबईच्या खार परिसरात हे श्री घंटेश्वर हनुमान मंदिर आहे.

खार स्टेशन रोडपासून 10 मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे.

या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. 

श्री घंटेश्वर हनुमान मंदिराची स्थापना 1961 साली झाली.

या मंदिराच्या स्थापनेपासूनच येथे घंटा बांधण्याची परंपरा आहे. 

मंदिरातील संपूर्ण भाग लहान-मोठ्या घंटांच्या माळानी भरलेला आहे.

भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे घंटा बांधतात.

या धार्मिक भावनेमुळे या मंदिरात 1 लाखांहून अधिक घंटा आहेत. 

येथे दान केलेल्या घंटांमुळे या मंदिराला घंटेश्वर हे नाव पडले आहे.