गणेशोत्सव: मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी?

गणेश उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला संपतो.

यंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्थीला संपेल.

भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी सुरू होईल - 18 सप्टेंबर 2023 दुपारी 12.39 वाजता

भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी समाप्त - 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 वाजता

गणेश मूर्ती स्थापनेची वेळ - 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.07 ते दुपारी 01.34 पर्यंत

शास्त्रानुसार, गणेशाचा जन्म भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला झाला होता. यासाठी गणेशोत्सव साजरा केला जातो.

याशिवाय, आणखी एका आख्यायिकेनुसार, महर्षी वेद व्यासांनी गणेशाला महाभारत रचण्यासाठी आमंत्रण दिले.

गणेश न थांबता व्यासजींनी सांगितलेले श्लोक लिहित राहिला. 10 दिवस सतत लिहिल्यामुळे गणेशजींवर धूळ आणि मातीचा थर साचला.

10 दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पाने सरस्वती नदीत स्नान करून स्वतःची स्वच्छता केली. त्यामुळे गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जातो.

पौराणिक कथेनुसार, गणेशाची निर्मिती देवी पार्वतीने चंदनाच्या लेपापासून केली होती. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here