सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये रेणावी नावाचा गाव शुद्ध शाकाहारी म्हणून ओळखले जाते.
रेणावी गावत शेकडो वर्षापासून मांसाहार केला जात नाही.
गावामध्ये प्रसिद्ध आणि पवित्र रेवणसिद्धीचं देवस्थान आहे त्यामुळे इथल्या दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव शाकाहारी आहे.
लग्नानंतर शाकाहारी राहावे लागले असं बोलणं करूनच महिलांना गावात यावं लागत.
सोने -चांदीच्या व्यवसायानिमित्त गावातील लोक देशभर विखुरलेले आहेत. तरीही ते शाकाहारी आहेत.
मुलगी पसंती आल्यानंतर मुलीस सांगितले जाते की शाकाहारी राहवे लागले. होकार आल्यानंतर पुढील बोलणी होते.
गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ते इथल्या प्रथा परंपरा नियमित पाळत आलेले आहेत.