कधीही एकादशीचं व्रत करताना या नियमांचं करा पालन; भगवान विष्णूची लाभेल कृपादृष्टी
हिंदू धर्मात अमावास्या, पौर्णिमेसह एकादशी, चतुर्थीसारख्या काही तिथींना विशेष महत्त्व आहे.
आपल्याकडे आषाढी आणि कार्तिकी एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते
दर महिन्याच्या एकादशींच्या व्रताच्या माध्यमातूनही भगवान विष्णूची आराधना केली जाते.
एकादशीला पवित्र स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे.
या दिवशी घरी येणाऱ्या साधू-संतांना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. त्यांना अन्न, धन किंवा वस्त्र दान केल्यास पुण्यफलप्राप्ती होते.
एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी भात, पान, वांगी, कोबी आणि पालक आदींचं सेवन करू नये
यादिवशी मांस, मद्य, कांदा आणि लसूण आहारात असू नये. सात्त्विक आहार घ्यावा.
एकादशीचं व्रत करणाऱ्याने आपल्या मनात इतर व्यक्तीविषयी वाईट किंवा कटू विचार आणू नयेत.
एकादशी दिवशी भाविकांनी काही विशेष नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.