ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहांचा आपल्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. 

आठवड्यातील प्रतेक वार विशिष्ट ग्रहाशी निगडीत आहे. 

आपण त्या त्या वारी त्या त्या ग्रहाशी संबंधित कपडे परिधान केले तर आपले नशीब बदलते 

आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी कमी होतात. नाशिबाची साथ मिळू लागते.

सोमवार : हा दिवस शिव शंकराचा मानला जातो . सोमवारी आपण सफेद रंगाचे कपडे धारण करावे.

मंगळवार :हा हनुमानाचा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी लाल,केसरी रंगाचे कपडे परिधान करावे .

बुधवार :  हा गणपती चा वार आहे. त्यामुळे त्या दिवशी हिरव्या रंगांचे कपडे परिधान करावे.

गुरुवार:  हा श्री हरी यांचा दिवस. म्हणून गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

शुक्रवार :हा दिवस माता लक्ष्मीचा आहे. या दिवशी आपण गुलाबी व सफेद रंग परिधान करू शकतो. 

शनिवार :  शनिवार हा दिवस शनि देवांचा आहे. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे परिधान करा.

रविवार : हा दिवस सूर्य देवाचा असल्याने या दिवशी आपण सोनेरी रंगाची,केसरी रंगाची कपडे घालावीत.