तुळशीला पाणी घालताना अनेकांच्या हातून होतात या चुका; पूजेचा लाभ नाही मिळत
आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे.
एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक श्रद्धा आहे.
एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी दिल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होते, असे मानले जाते.
या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते, त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे
पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे.
म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे.
सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.