श्रावणात 'या' वस्तुंचं करा दान, आर्थिक भरभराट होईल.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत 'या' वस्तू दान केल्या की, तुमची समृद्धी होते.
श्रावणात मीठाचं दान शुभ मानलं जातं. तुमच्या समस्या सुटतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
गुळाचं दान केल्याने तुम्हाला मनासारखं जेवण मिळतं आणि घरात अन्नाचा तुटवडा भासत नाही.
श्रावणात काळे तिळ दान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि मनस्थितीही उत्तम राहते.
एखाद्या नागाच्या मंदिरात चांदीचे शिवलिंग दान केलंत की, लाभदायक असतं.
श्रावणात तुपाचं दान विशेष केलं पाहिजे. त्याने तुमचं आजारपण दूर होतं आणि आरोग्य व्यवस्थित राहतं.
धान्याचं दानदेखील महत्त्वाचं ठरतं. त्यात तांदळाचं दान केलंत की, अधिक शुभ ठरतं.
रुद्राक्ष महादेवाचं अत्यंत प्रिय आहे. रुद्राक्षाचं दान केलंत की, अनेक इच्छा पूर्ण होतात.
एखाद्या गरजू व्यक्तीला कपड्याचं दान करा. तुमच्यावर शंकराची विशेष कृपा होईल.