देवासमोर दिवा लावताना हा एक मंत्र म्हणावा

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

या परंपरेनुसार अग्निदेवाच्या साक्षीने कोणतेही कार्य केले तर ते निश्चितच सफल होते, असा धार्मिक विश्वास आहे. 

या संदर्भात शास्त्रात सांगण्यात आले आहे की देवतांच्या समोर दिवा लावताना काही विशेष मंत्रांचे पठण करावे.

असे केल्याने देवता प्रसन्न होतात. ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी या विषयावर दिलेली माहिती पाहुया

पूजेच्या वेळी तुप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

याशिवाय दररोज पूजा करताना किंवा इतर वेळीही दिवा लावल्याने घरातील सदस्यांची कार्यक्षमता आणि कीर्ती वाढते.

वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्यासाठी घराच्या आग्नेय कोपऱ्याचा वापर करावा. असे मानले जाते की या दिशेला दिवा लावल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो

याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असणारे हानिकारक सूक्ष्मजीव किंवा जंतू नष्ट होतात.

शुभम करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम्, शत्रु बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here