नखं कापताना दिवस पहावा का? ते दोन दिवस तरी टाळावेच, आठवड्यातील हा दिवस शुभ

नखे कापण्यासाठी कोणता दिवस योग्य आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? 

सोमवारी -धार्मिक ग्रंथानुसार सोमवारचा दिवस भगवान शिव, मन आणि चंद्राशी संबंधित मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी नखे कापल्याने तमोगुणांपासून मुक्ती मिळते.

मंगळवारी नखे कापल्याने कर्जातूनही मुक्ती मिळते, असे म्हणतात.

बुधवारी नखं कापल्यानं अचानक आर्थिक लाभ होतो, तसेच करिअरमध्ये पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग खुले होतात, असे म्हणतात.

गुरुवारी नखे कापल्याने माणसातील सत्त्वगुण वाढतात, असे म्हणतात.

ज्योतिष शास्त्रानुसार नखे कापण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम मानला जातो. शुक्रवारी नखे कापल्याने नात्यात गोडवा येतो.

शनिवारी नखे कापल्यानं शनि कमजोर होतो. शारीरिक त्रास, पैशाची हानी होऊ शकते. मानसिक समस्या देखील होऊ शकतात.

ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी नखे कापू नयेत. असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो, असे मानले जाते.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.