देव्हाऱ्यात हळदीनं काढा ही शुभ चिन्हे

आपल्याकडे कित्येक घरांमध्ये देव्हाऱ्यात स्वस्तिक, ओम, कलश चिन्ह किंवा श्री लिहिलेले तुम्ही अनेकदा पाहिले असेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, ही चार पवित्र प्रतीक आहेत, जी थेट देवाची कृपा दर्शवतात.

ज्या घरांच्या देवघरात अशी चिन्हे लावली जातात किंवा स्थापित केली जातात, त्या घरांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. 

वास्तुशास्त्रानुसार श्री चिन्ह हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरांमध्ये हे चिन्ह देव्हाऱ्यात लावलेले असते त्या घरांमध्ये माता लक्ष्मी स्वतः वास करते.

देव्हाऱ्यात चंदन किंवा कुंकूने ओम चिन्ह काढतात. असे मानले जाते की, हे चिन्ह देव्हाऱ्यात काढल्यानं कौटुंबिक जीवनात चालू असलेल्या समस्या संपतात

ओमचे स्मरण केल्यानं एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. यासोबतच जीवनातील यशाचा मार्ग मोकळा होतो.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पद्म म्हणजेच कमळाचे चिन्ह हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेचे प्रतीक मानले जाते.

घराच्या मुख्य दारावर किंवा देव्हाऱ्यात स्वस्तिकचे चिन्ह हळदीनं काढणं शास्त्रात खूप शुभ मानलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते.

ज्या घरांमध्ये स्वस्तिक हे चिन्ह बनते, तेथे नेहमी सकारात्मक उर्जेचा प्रवाह असतो. हे प्रतिक वाईट शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here