मनात सतत काहीतरी अघटित घडण्याची भीती लागून राहते? कापराचे हे अचूक उपाय करून बघा

वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, त्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते.

 गुलाबाच्या फुलात कापूर टाकून 43 दिवस नियमित दुर्गा देवीजवळ जाळा. या उपायाने धनप्राप्तीचे साधन हाती येतं, असं मानलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार पैशाची कमतरता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंग जाळू शकता.

ज्या व्यक्तींना नेहमी अचानक काहीतरी घडण्याची भीती वाटते, त्यांनी कापूर जाळून हनुमान चालिसा म्हणावी

वास्तुशास्त्रानुसार देवतांसमोर नियमित कापूर जाळल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.

 ज्या घराच्या पूजेमध्ये कापूर नियमितपणे वापरला जातो, त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, आरोग्य राहतं.

ज्या घरामध्ये नेहमी तणाव आणि कलहाचे वातावरण असते. तेथे नियमितपणे कापूर जाळणे शुभ असते. त्यामुळे नात्यात गोडवा येतो.

वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळण्यापूर्वी तो एकदा तुपात बुडवावा. या उपायाने कापुराचा खूप छान वास येतो

दिल्लीचे ज्योतिषी पंडित आलोक पंड्या यांनी घरी कापूर जाळण्याचे इतके फायदे सांगितले आहेत.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.