कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
जीवनात येणाऱ्या संकटांमुळे अनेकदा लोक घाबरतात. जीवनात चढ-उतार येणे साहजिक बाब आहे. पण..
तुमच्या कामात सतत समस्या येत असतील. त्यामुळे अशा स्थितीत आपण विद्वान ज्योतिषाच्या सल्ल्याने रत्नही धारण करू शकता.
ज्योतिषशास्त्रानुसार, रत्नांमध्ये इतकी शक्ती असते की ते कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य उलथापालथ करू शकतात.
रत्न धारण करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत.
कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी, एखाद्या विद्वान ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवणे फार महत्त्वाचे आहे.
रत्न खरेदी करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. रत्नाचा रंग, आकार, वजन आणि शुद्धता जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
रत्न कोठूनही तुटलेले असू नये. रत्न खरेदीसाठीही शुभ मुहूर्त आहेत. खरेदी करताना त्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक आहे.
रत्न अंगठीत किंवा लॉकेटमध्ये घालायचे असेल तर हे रत्न तुमच्या त्वचेला स्पर्श करणारे असणे आवश्यक आहे.
रत्न संबंधित ग्रहाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर, शुभ नक्षत्रात आणि शुभ मुहूर्तावर पूर्ण विधी केल्यानंतरच धारण करावे.
कोणतेही रत्न त्याच्या नेमलेल्या बोटात धारण केले पाहिजे. याशिवाय रत्न धारण केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा बोटातून काढू नये.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)