हातउसने असो कि बँकेतून, कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ; फेडताना नाकीनऊ येऊ शकतं

विविध कारणांसाठी कर्ज घेणं ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु, अनेकांना कर्ज वेळेवर फेडता येत नाही.

कर्ज घेण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठी योग्य वेळ न निवडणे, हे त्याचे शास्त्रात कारण मानले गेले आहे.

काही वार आणि नक्षत्रांचा काळ कर्ज घेण्यासाठी अशुभ मानला जातो.

यामध्ये मंगळवार, बुधवार आणि शनिवार या दिवसांचा समावेश आहे.

 हस्त, मूल, आद्रा, ज्येष्ठ, विशाखा, कृतिका, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढ, उत्तराभाद्रपद, रोहिणी इत्यादी नक्षत्रांवर कर्ज देण्या-घेण्याचे व्यवहार करू नयेत.

रविवारी कर्ज घेणे आणि देणे देखील शुभ नसतं. या दिवसात आणि नक्षत्रांमध्ये घेतलेले कर्ज फेडताना अनंत अडचणी येतात.

सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार हे कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस मानले जातात.

कर्ज फेडण्यासाठी मंगळवार आणि बुधवार शुभ मानले जातात.

शुक्रवारी कर्ज घेणे आणि देणे हे दोन्ही फलदायी मानले जातात.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.