शनिवारी केलेल्या या कामांनी शनिदेव होतात प्रसन्न; नशीबाची मिळते साथ

शनिवार हा कर्माचा दाता शनिदेवाच्या पूजेचा दिवस. या दिवशी शनिची पूजा केल्यानं लाभ होतो.

शनी पूजेने कोर्ट-कचेरीसारख्या गुंतागुंतीच्या कामांमध्ये यश मिळेल, व्यवसायातही प्रगती होईल.

तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ.कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून शनिवारचे उपाय जाणून घेऊयात

शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. त्यानंतर एक कच्चा धागा घेऊन झाडाला सात वेळा गुंडाळा. शनिदेवाचे स्मरण करा

साडेसातीचा त्रास होत असेल तर तुम्ही ऊँ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा

शनिवारी उपवास करणे आणि शनिदेवाची पूजा करणे विविध कामांमध्ये खूप फायदेशीर ठरू शकते.

वाईट संगत आणि वाईट व्यसन सोडणे हा सर्वात सोपा उपाय, असहाय लोकांना मदत करा, या कार्यांमुळे तुमचा शनीदोष राहणार नाही.

असहाय लोक, स्त्रिया, मुले यांना दुखावले असेल, तसेच कावळा, कुत्रा, गाय यासह इतर प्राण्यांना त्रास देणे टाळावे.

कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावा आणि दर शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करा.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.