लवकर लग्न जुळण्यासाठी ज्योतिषीय उपाय
प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठांचे स्वप्न असते की, आपल्या मुला-बाळांची लग्ने योग्य वेळी व्हावीत, परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अलिकडच्या काळात अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ज्योतिषशास्त्रात लग्नाची गणना कुंडली पाहून केली जाते. कुंडलीत ग्रहांची प्रतिकूल स्थिती असल्यास विवाहात अडथळे येतात.
ग्रहमान अनुकूल असल्यास एखाद्या व्यक्तीचे लग्न लवकर होते. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची दोन प्रकारात विभागणी केली आहे.
शुभ ग्रह विवाहाचे कारक आहेत आणि अशुभ ग्रहांमुळे विवाहात विलंब होतो. ज्योतिष शास्त्रानुसार गुरू आणि शुक्र या ग्रहांच्या बलामुळे विवाहाची शक्यता लवकर निर्माण होते.
ज्योतिष शास्त्रानुसार गुरू ग्रह मुलींच्या विवाहाचा कारक मानला जातो. कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत असेल तर मुलीचे लग्न लवकर-वेळेत होते.
वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर रोज अर्गलास्तोत्रम् चा पाठ करावा. असे मानले जाते की हा पाठ केल्याने वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि विवाहाची शक्यता निर्माण होते.
घरातील वास्तुदोषामुळे लग्नात अनेक वेळा अडथळे येतात. यासाठी बेडरुममध्ये कोणत्याही प्रकारच्या जड किंवा वजनदार वस्तू ठेवू नका
लवकर लग्नासाठी गणेशाची पूजा करा. गणेशाची पूजा केल्यानं बुधही बलवान होतो. विशेषत: गणेशाला मोदक अर्पण केल्यानं अविवाहित मुलांचे लग्न लवकर होऊ शकते.
लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी केळीच्या रोपाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे. यानंतर गुरू मंत्राचा 108 वेळा जप करा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.
होमहवन-पूजेमध्ये 'स्वाहा-स्वाहा' का म्हणतात?
Click Here