तुमच्या घरात पण मोजून चपात्या करतात?

एकत्र कुटुंबपद्धतीत जेवण हिशोबानं केलं जात नाही. मात्र, विभक्त कुटुंबपद्धतीत प्रत्येक माणसाला जितके अन्न लागणार आहे तितकेच मोजमापाने बनवले जाते.

सध्या प्रत्येक माणूस किती पोळ्या खाईल याच्या हिशोबाने त्या बनवल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या वाटच्या मोजून पोळ्या/चपाती खाव्या लागतात.

बैठी जीवनशैली पाहता कमी खाण्याची ही ट्रिक दिसायला तरी चांगली दिसते, मात्र यामुळे आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

 यामुळे केवळ कुंडलीतील शुभ ग्रहांवरच परिणाम होत नाही तर सुख-शांतीही नष्ट होऊ शकते. तसेच कुटुंबियांचे आरोग्यही धोक्यात येते, असे मानले जाते.

ज्योतिषाचार्यांच्या मते घरातील कुटुंबियांसाठी जेवणात जितक्या पोळींची गरज असते त्यापेक्षा 4 पोळ्या अधिकच बनवल्या पाहिजेत.

 यात पहिली पोळी ही गायीसाठी बनवली पाहिजे. तर शेवटची पोळी ही नेहमी कुत्र्यासाठी बनवली पाहिजे, असे सांगितले जाते.

उरलेल्या २ पोळ्या या पाहुण्यांसाठी ठेवल्या पाहिजेत. हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हटले जाते. कोणी अचानक आल्यास त्याचा उपयोग होतो.

पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळशी असतो. फ्रीजमध्ये ठेवून शिळ्या पीठापासून पोळी बनवल्यास निर्माण झालेल्या बॅक्टेरियाचा संबंध राहूशी येतो.

ताटात एकावेळी तीन चपाती/भाकरी वाढून घेणे चुकीचे आहे. त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)