अक्षय्य तृतियेला या 5 वस्तू घरी आणणं शुभ

अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते, याला अखातीज असेही म्हणतात. 

यावर्षी अक्षय्य तृतीया शनिवार, 22 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्याची चांगली संधी आहे.

 अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे पुण्य अक्षय असते, ते कधीच संपत नाही, म्हणूनच अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जव दान करणे खूप शुभ मानले जाते. त्याचे दान सोने दान करण्यासारखे आहे. अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोने खरेदी करू शकता, जर ते शक्य नसेल तर जव (बार्ली) खरेदी करा.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूसोबत लक्ष्मी पूजा करावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. वैवाहिक जीवन सुखाचे राहते. 

तुम्ही देवी लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा करू शकता. यामुळे तुमची संपत्ती, कमावलेल धन स्थिर राहील. 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कलश घेऊन त्यात स्वच्छ पाणी भरावे. नंतर त्यात थोडे गंगाजल मिसळा. हा कलश एखाद्या गरीब ब्राह्मणाला दान करा.

पौराणिक कथेनुसार, ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षयकुमारचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया तिथीला झाला होता, म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान इत्यादी केल्यानं अक्षय्य फळ मिळतं. त्यामुळे पूर्वज त्यांच्या वंशजांवर आनंदी राहतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.