हिंदू कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात, परंतु दर तिसऱ्या वर्षी अधिक महिन्यामुळे वर्षात 13 महिने येतात.
सनातन धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. यामध्ये भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि काही कामं करणे टाळले जाते.
वर्ष 2023 मधील अधिक मास सुरू झाला आहे, जो खूप महत्त्वाचा आहे कारण हा योगायोग 19 वर्षांनी घडला आहे.
श्रावण महिन्यात भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
या दरम्यान कोणती कामे करू नयेत आणि कोणती कामे केल्याने फायदा होतो? याविषयी ज्योतिषांनी दिलेली माहिती जाणूून घेऊ.
अधिक मासात काही निषिद्ध कामे केल्यानं महादेव आणि भगवान विष्णू दोघांचीही कृपा मिळत नाही, असे मानले जाते.
या महिन्यात गृहप्रवेश, लग्न, साखरपुडा, घरबांधणी, वधूप्रवेश, देवतांचा अभिषेक इत्यादी शुभ कार्ये करू नयेत, असे मानले जाते.
बोअरवेल, विहीर खणने आदी कामे करू नयेत, अधिक मासात ही कामे करणं अशुभ मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषोत्तम महिन्यात उपासना, व्रत, दान, भजन कीर्तन यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
या दरम्यान श्रीमद भगवत गीता, यज्ञ, हवन, भागवत पुराण आणि विष्णु पुराण यांचे पठण किंवा श्रवण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ
Click Here