प्रत्येक राशीनुसार शनिवारी करावे हे काम

मेष : आज लहान मुलींना खीर खायला द्या. यामुळे मानसिक शांती मिळेल आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

वृषभ : आज काळा सुरमा लावा. काळे तिट लावून आरोग्यामध्ये सुधारणाही जाणवेल.

मिथुन : तांब्याचे नाणे किंवा तुकडा खिशात ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.

कर्क : चांगले पदार्थ बनवा आणि सोन्याच्या किंवा तांब्याच्या चमच्याने खा. घरामध्ये शुभ कार्याचा मार्ग मोकळा होईल.

सिंह : घरात एक फिश अक्वॅरियम ठेवा, ज्यामध्ये 1 काळे आणि 10 सोनेरी मासे असतील, यामुळे प्रेमसंबंध दृढ होतील.

कन्या : आर्थिक प्रगतीसाठी हिरव्या वाहनाचा वापर करा. दिवस शुभ राहील.

तूळ : आज पांढरे-काळे शूज घाला. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

वृश्चिक : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळण्यासाठी खिशात हिरवा रुमाल ठेवा.

धनु : बेसणाची मिठाई, बेसणाचा कोणताही तळलेला पदार्थ गरिबांमध्ये वाटून द्या.

मकर : हनुमानजींना चमेलीचे तेल, सिंदूर, चांदीचे वस्त्र अर्पण केल्याने आरोग्यात सुधारणा जाणवेल.

कुंभ : तुमच्या वजनाएवढे जव दान करा. गौ-आश्रमात जव दान केल्याने कौटुंबिक जीवन सुखी होईल.

मीन : पांढऱ्या गाईला गहू आणि गूळ खाऊ घाला. सकारात्मकता येईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)