बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात.
ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात S या अक्षराने होते त्या व्यक्ती सहज मित्र बनवतात. त्या सर्जनशील आणि हुशार असतात.
त्या आपल्या स्वतःच्या आवडी वाढवण्यासाठी इतरांचा उपयोग करून घेऊ शकतात. या व्यक्ती लोकांशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात. या व्यक्ती खरोखर एकनिष्ठ असतात
त्यांच्या मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वृत्तीमुळे त्यांची सहजपणे गटाचा नेता म्हणून निवड होते. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेऊ शकतात.
विद्यार्थ्यांसाठी S हे अक्षर भाग्यास आणि प्रगतीस कारणीभूत ठरतं. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यास आणि संवादावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
महत्त्वाच्या मीटिंगला जाताना पिवळे, केशरी, पांढरे, लाल, निळा इत्यादी उठावदार रंगांचे कपडे घालावेत. अशा व्यक्तींना देश-विदेशात चमक दाखवता येते.
या व्यक्तींना जीवनात समृद्धी मिळवून देण्यासाठी त्यांच्या जोडीदारांचंही तितकंच योगदान असतं. या व्यक्ती चांगले पालक आणि मुलं होऊ शकतात.
उपाय :1. आश्रमात गहू दान करा.2. सूर्याला अर्घ्य द्या आणि त्याच्या नावाचा जप करा.3. ऑफिसमध्ये उत्तरेकडच्या भिंतीवर कृत्रिम सूर्यफूल लावा.
4. आठवड्यातून किमान एकदा आंघोळीच्या पाण्यात हळद घालून त्या पाण्याने आंघोळ करा.5. चामड्याची नसलेली पिशवी किंवा पाकीट नेहमी सोबत ठेवा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ
Click Here