नावातील पहिल्या अक्षरालाही ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे मानले जाते. नावातील पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येऊ शकतो.
#अक्षर B: ज्या व्यक्तींचं नाव B अक्षरानं सुरू होतं, त्यांचे विचार फार चांगले आणि कृतींशी पूर्णपणे सुसंगत असतात.
अशा व्यक्ती कधीही वाद न घालता चर्चा करतात. या व्यक्ती मितभाषी आणि स्वतःच्या विचारात मग्न असतात.
त्यांच्याकडे उत्कृष्ट कल्पनाशक्ती असते, त्यामुळे त्या समृद्ध काल्पनिक जगात वावरू शकतात. परिणामी या व्यक्ती कधीकधी कमी व्यावहारिक बनतात.
तरीही प्रसंगी त्या तर्कसंगत दृष्टिकोनाचा वापर करून गुंतागुंतीतून बाहेर येण्याचा मार्ग शोधतात.
B अक्षरानं नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती खूप संयम बाळगून मित्र बनवतात. त्या कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत.
स्वत:ला प्रगत करण्यात आणि स्वतःचं ज्ञान वाढवण्यात त्यांना रस असतो.
त्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे आयुष्यात उत्कर्ष होत नाही किंवा व्हायला वेळ लागतो.
उपाय: शंकराला दुधाचा अभिषेक करावा आणि चंद्र मंत्राचा जप करावा. शुभ रंग: Sky blue
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
S अक्षरानं नाव सुरू होणारे कसे असतात?
Click Here