झोपेत साप चावल्याचं स्वप्न पडणं हा कसला संकेत?

स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील काही घटनांचे संकेत असतात.

स्वप्नात साप चावणे, साप दिसणे हा प्रकार नेमका काय आहे, याविषयी जाणून घेऊया.

स्वप्नात स्वत:ला साप चावल्याचे दिसले असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. , तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल.

स्वप्नात मृत साप दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, जीवनात आतापर्यंत ज्या समस्या होत्या त्या संपणार आहेत.

स्वप्नात साप आपला पाठलाग करताना दिसला तर हे स्वप्न अशुभ. अडचणी वाढण्याचा तो संकेत समजावा.

 स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप दिसणे शुभ मानले जाते. हे स्वप्न धन लाभ आणि प्रगती दर्शवते.

स्वप्नात उडणारा साप दिसला तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न आर्थिक संकटासारख्या गोष्टी सूचित करतं.

स्वप्नात साप आणि मुंगूस भांडताना दिसले तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला नाहक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)