#अक्षर F : ज्या व्यक्तींची नावं F अक्षरापासून सुरू होतात, त्या फार कुटुंबवत्सल असतात.
या व्यक्तींची घराशी घट्ट नाळ जोडलेली असते. या व्यक्ती तात्पुरत्या कारणासाठी जरी घराबाहेर पडल्या तरी त्यांना सतत घरची आठवण येते.
या व्यक्ती बऱ्याचदा बालिशपणाही करत असतात; पण त्यांचा हा बालिशपणा करमणूक करणारा असतो.
F अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती नीतीला धरून चालणाऱ्या, सत्याचा आदर करणाऱ्या असतात.
त्यांना इतरांची सेवा करण्याची इच्छा असते. या व्यक्ती अतिशय उदार वृत्तीच्या असतात.
या व्यक्ती अतिशय निरागस असतात. त्यामुळे इतर व्यक्ती त्यांचा गैरवापर करून घेण्याची शक्यता असते.
म्हणून त्यांनी सावध राहिलं पाहिजे. नाही तर मन दुखावलं जाण्याची शक्यता असते.
F अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.
या व्यक्ती वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात खूप चांगल्या पार्टनर बनतात.
या व्यक्ती एकनिष्ठ असतात आणि निवडलेल्या तत्त्वांचं पालन करतात. या व्यक्ती देशभक्तदेखील असतात.
आपल्या देशाची सेवा करण्यासाठी त्या काहीही करू शकतात. या व्यक्ती विश्वासू आणि शांतता प्रेमी असतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
B अक्षरानं नाव सुरू होणारे कसे असतात?
Click Here