#अक्षर D: ज्या व्यक्तींचं नाव D अक्षरापासून सुरू होतं त्यांच्याकडे फार आत्मविश्वास असतो.
त्या स्वत:वर नियंत्रण ठेवू शकतात. हे गुण त्यांना यशाकडे घेऊन जातात.
D हे अक्षर चांगल्या नशीबाचं प्रतीक असून या नावाच्या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात उंची गाठू शकतात.
या व्यक्ती सर्जनशील असतात आणि त्यांच्याकडे आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता असते.
D अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड असतात. त्यांच्या आयुष्यात समृद्धी असते.
या व्यक्ती मितभाषी असतात पण त्या मोजक्या शब्दांमध्ये आपलं म्हणणं योग्यपणे मांडू शकतात. या गुणामुळे त्या उत्कृष्ट नेता, सेल्समन बनू शकतात.
या व्यक्ती सत्याबाबत एकदम जागरूक असतात आणि आग्रही असतात. सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे यासाठी पाठपुरावा करतात.
D अक्षरानं नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती इतरांचा आदर करतात आणि स्वतःसाठीदेखील त्याच आदराची अपेक्षा करतात.
या व्यक्ती समाजात सर्वोच्च दर्जाचं स्थान आणि कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठित स्थान मिळवतात.
त्यांची विनोदबुद्धीदेखील चांगली असते. म्हणूनच, लोकांमध्ये त्यांचा व्यक्तीमत्त्वाचा जास्त प्रभाव पडतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
B अक्षरानं नाव सुरू होणारे कसे असतात?
Click Here