अधिक मासात जोडव्यांमध्ये भर घालतात? 

17 जुलै 2023 ला मध्यरात्री अमावस्या संपून 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू झाला. 

तर 16 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 03 वाजुन 07 मिनिटांनी अधिक महिना संपेल आणि श्रावण महिना सुरू होईल. 

अधिक महिन्यात जावयाला, ब्राह्मणाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे या गोष्टी कराव्या.

आईची पूजा करुन आईची ओटी भरणे, मंदिरात देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व 18 जुलै ते 15 ऑगस्ट ह्या दरम्यान करण्याची परंपरा आहे. 

श्रावणातील व्रत-वैकल्य, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 ह्या दरम्यान करावे. 

सौभाग्य वस्तू अलंकारांमध्ये या महिन्यात भर घालणे शुभ मानले जाते. विशेषत: पायातील जोडव्यांमध्ये भर घालून ती वाढवून घ्यावीत. 

अधिक महिन्यात रविची संक्रांत होत नाही. ह्या महिन्यास पुढील महिन्याचे नाव असते.

अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना अशी नावंही आहेत.

अधिक महिन्यात दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here