रात्री अशी स्वप्ने नशीबवान लोकांनाच पडतात; भविष्यात भाग्य चमकण्याचे असतात ते संकेत
झोपेत स्वप्न पाहणं ही एक तशी सामान्य प्रक्रिया आहे.
स्वप्न विज्ञानाचा असा विश्वास आहे की, झोपेत दिसणारं प्रत्येक स्वप्न आपल्याला भविष्याबद्दल चांगले किंवा वाईट संकेत देते.
रात्री झोपेत पडणारी स्वप्ने आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटना दर्शवतात.
काही लोकांना त्यांच्या स्वप्नात प्राणी आणि पक्षी दिसतात तर काही लोकांना पैसा दिसतो.
स्वप्नात पोपट दिसला तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच कुठूनतरी पैसे मिळतील. स्वप्नात पोपट दिसणं हे धनलाभासाठी शुभ मानले जाते.
स्वप्नात मधमाशांचे पोळे दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे उत्पन्न वाढणार आहे, तुमचा येणारा काळ आनंदात आणि ऐषोआरामात घालवाल.
स्वप्नात देव किंवा देवी दिसत असतील तर याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुम्हाला अचानक पैसे मिळतील.
स्वप्नात फळांनी भरलेले झाड किंवा अनेक झाडे दिसणं शुभ चिन्ह. त्याचा अर्थ येत्या काळात तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता.
स्वप्नात काळा विंचू दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ चिन्ह आहे. हे स्वप्न सूचित करते की लवकरच तुम्हाला कुठूनतरी संपत्ती मिळणार आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)