चंद्रग्रहण या राशींना अशुभ ठरणार

वर्षातील पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी होईल. वैज्ञानिकदृष्ट्या, जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते.

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापूर्वीचा सूतक काळ मानला जातो. चंद्रग्रहणापूर्वीचा सूतक कालावधी अशुभ मानला जातो.

2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे 2023 रोजी रात्री 8:45 वाजता सुरू होईल आणि उशीरा पहाटे 1:00 वाजता संपेल.

हे चंद्रग्रहण उपच्छाया चंद्रग्रहण असेल. या दिवशी वैशाख पौर्णिमा देखील आहे. ज्याला आपण सर्वजण बुद्ध पौर्णिमा या नावाने ओळखतो.

या चंद्रग्रहणामध्ये काही राशींना लाभ तर काहींना नुकसान, त्रास सहन करावा लागू शकतो. विशेषत: 4 राशीच्या लोकांना चंद्रग्रहण त्रासदायक ठरेल

मेष राशीच्या लोकांच्या कामात अडचणी येतील. मन अशांत राहील, रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

वृषभ राशीला हे चंद्रग्रहण तापदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनात वाद-विवाद होऊ शकतात.

कर्क राशीच्या लोकांनाही सगळं असूनही सुख मिळणार नाही. काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, अस्वस्थ वाटू लागेल.

तूळ राशीच्या लोकांना प्रकृती साथ देणार नाही. शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देतील, त्यामुळे खर्च वाढतील.

वर्षातील पहिले चंद्रग्रहण उपच्छाया चंद्रग्रहण. म्हणजेच पृथ्वीची सावली चंद्रावर फक्त एका बाजूला असल्याने हे ग्रहण भारताव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणांहून पाहता येईल. 

चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक कालावधी येथे वैध राहणार नाही.

(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here