तुळशीची 11 पाने बदलतील तुमचे नशीब

तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात लावलेले आढळते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे.

तुळशीमुळे वास्तु दोष उरत नाही, घरात सुख-समृद्धी येते. तुळशीमुळे घराचे आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. 

हिंदू धर्मात सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीच्या वनस्पतीचा आयुर्वेदात औषध म्हणूनही उपयोग होतो.

आपली काही मनातील इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची 11 पाने व्यवस्थित तोडा.

हनुमानाला अर्पण केलेल्या केशरी सिंदूरात थोडं तेल मिसळा आणि त्यानं तुळशीच्या पानांवर श्रीराम नाव लिहा, या पानांची माळ बनवा आणि बजरंगबलीला अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा.

घरात अशांततेचे वातावरण असेल तर तुळशीची चार-पाच पाने घेऊन धुवून स्वच्छ करा. यानंतर स्वच्छ पाण्यानं भरलेले पितळेचे भांडे किंवा कोणतेही भांडे घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून ठेवा. 

दररोज स्नान केल्यानंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडा. असं केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते, असे मानले जाते.

तुळशीची पाने लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या पाकिटातही ठेवू शकता. असे केल्याने आर्थिक संकट लवकर दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

 कामांमध्ये यश मिळत नसेल आणि नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर त्यासाठी पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चिमूटभर हळद टाका आणि संध्याकाळी तुळशीसमोर लावा.

हा दिवा तुळशीच्या मुळांमध्ये उत्तर दिशेला ठेवल्यास नशीब साथ देते आणि अडकलेली कामंही होऊ लागतात, असे मानले जाते.

(सूचना : येथे दिलेली काही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्ज घेण्यासाठी हे दिवस अशुभ

Click Here