हेल्मेट घातले तरी होणार हजार रुपये दंड, काय आहे नवा नियम?
दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी आता पूर्वीपेक्षा वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.
तुम्ही जरी हेल्मेट घातले असेल तरी देखील तुम्हाला नव्या नियमानुसार दोन हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो
हेल्मेटमुळे आजपर्यंत अनेकांचा अपघातामध्ये जीव वाचला आहे, मात्र तरी देखील अनेक जण प्रवासावेळी हेल्मेट घालण्याचं टाळतात.
दरवर्षी हजारो दुचाकीस्वारांचा केवळ हेल्मेट न घातल्यानं मृत्यू होतो.
आता असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
तुम्ही जरी हेल्मेट घातले असेल आणि त्याची स्ट्रिप ओपन असल्याचं निर्दशनास आल्यास तुम्हाला हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
तसेच तुम्ही जर BIS नोंदणीकृत हेल्मेट घातले नसेल तरी देखील तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो.
त्याचप्रमाणे रहदारीच्या रस्त्यावर तुमच्या दुचाकीची स्पीड ही चाळीस पेक्षा अधिक असेल तरी तुम्हाला दंड होऊ शकतो.