बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी उलगडणारी काही दुर्मीळ छायाचित्र
व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली आणि 50 च्या दशकातच आपल्या चित्रांमधून राजकीय भाष्य करायला सुरुवात केली.
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली
शिवसेना हा अल्पवधीतच महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा पक्ष बनला
राज आणि उद्धव यांना बाळासाहेबांकडूनच राजकारणाचे धडे मिळाले
बाळासाहेबांची तीनही मुलं उद्धव, जयदेव, बिंदुमाधव आणि सुना यांच्यासमवेत बाळासाहेब आणि मीनाताई
पुढे काही कारणांमुळे राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेची सर्व जबाबदारी उद्ध ठाकरे यांच्याकडे आली
बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं, त्यांच्या मृत्यूनं राजकारणातील एका झंझावती पर्वाचा अस्त झाला