डॉ. तरुणीला प्रेम करण्याची शिक्षा, थेट मृत्यूच!
ऑनर किलिंगच्या घटनेनं नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, प्रेमसंबंधामुळे आई-बापानेच आपल्या मुलीची हत्या केली
लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पिंपरी माहिपाल गावातील ही घटना आहे.
शुभांगी जोगदंड असं मृत मुलीचं नाव आहे, ती बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती
शुभांगीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, मात्र घरच्यांचा प्रेमाला विरोध होता
घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले होते, मात्र प्रेमसंबंधामुळे हे लग्न मोडलं
लग्न मोडल्याच्या रागातून कुटुंबानं टोकाचं पाऊल उचलं, आणि तिची हत्या केली
हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून, राख ओढ्यात टाकून देण्यात आली
विशेष म्हणजे हत्या झाल्यानंतर जणू काही झालचं नाही अशा थाटात तिचे कुटुंब गावात वावरत होते.
मात्र प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणात कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यत आली आहे.