हिंदू धर्मामध्ये लग्नातल्या सप्तपदीदरम्यान एक महत्त्वाचा विधी केला जातो. त्यामध्ये नववधूच्या पायाच्या एका बोटामध्ये जोडवी घातली जातात. 

हिंदू महिला आयुष्यभर ही जोडवी आपल्या पायाच्या बोटांमध्ये परिधान करतात.  यामागे धार्मिक कारण तर आहेच. परंतु वैज्ञानिक कारणही आहे.

जोडवी घालण्यामागचं धार्मिक कारण रामायण काळाशी संबंधित आहे. 

असं मानलं जातं, की जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं, तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांसाठी खूण म्हणून जोडवी मागे सोडली होती. 

जोडवी हा महिलेला आपल्या पतीशी जोडून ठेवणारा दुवा असतो. त्यामुळे ते कायम एकत्र राहतात असं मानलं जातं.

जोडवी घालण्यामागे एक अतिशय महत्त्वाचं असं वैज्ञानिक कारणदेखील आहे. 

जोडवी पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटांमध्येच घातली जातात. ती अ‍ॅक्युप्रेशरचं काम करतात. 

या बोटांच्या नर्व्ह्ज महिलेच्या हृदयाशी आणि गर्भाशयाशी जोडलेल्या असतात. 

जोडवी घातल्यामुळे या बोटाच्या नर्व्ह्जवर दाब पडतो. त्यामुळे या नसांमधलं ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण सुरळीत राहतं. 

त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. महिलेला अनियमित पाळीची समस्या असली, तर त्यासाठीदेखील जोडवी घालणं उपयुक्त ठरू शकतं. 

Your Page!