महाविकास आघाडीत नाना 'पटेना'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कायम चर्चेत असतात 

छ. संभाजीनगरमध्ये झालेल्या 'मविआ'च्या सभेला दांडी मारली अन् पटोले पुन्हा चर्चेत आले. 

नाना पटोले हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या 

मात्र त्यानंतर मविआच्या नेत्यांकडून या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.

नाना पटोले आजारी असल्यामुळे ते सभेला येऊ शकले नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं .

तर या सभेमध्ये प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलणार हे आधीपासूनच ठरलं होतं, असं अजित पवार म्हणाले.

दुसरीकडे सावरकरांच्या मुद्द्यावरून देखील सातत्यानं शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

 सावरकरांच्या मुद्द्यावर पटोलेंकडून काँग्रेसची भूमिका अतिशय आक्रमकपणे मांडण्यात येत आहे. 

याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने देखील इशारा दिला आहे, त्यामुळे पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे.