शिवसेनेला आतापर्यंत बसलेले हादरे 

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे.

शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी केली.

शिवसेनेने स्थापनेपासून अनेक स्थित्यंतर पाहिली, अनेक धक्के पचवले.

 शिवसेनेला पहिला हादरा हा छगन भुजबळ यांच्या रुपाने बसला.

छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

भुजबळांच्या धक्क्यानंतर शिवसेना स्थिर झाली, मात्र त्यानंतर नारायण राणे यांनी बंड केलं.

नारायण राणे यांच्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले.

राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 ला मनसेची स्थापना केली.

हे सर्व धक्के शिवसेनेने पचवले, यातून सावरत शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष बनला. 

मात्र 2022 मध्ये शिवसेनेला एकनाथ शिंदें यांनी मोठा धक्का दिल्ला, या धक्क्यामुळे राज्यात सत्तापालट झाली.