मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल माहित नसलेल्या 'या' गोष्टी

एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला 

त्यांनी ठाण्याच्या मंगला हायस्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं

घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिंदे यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं, त्यानंतर त्यांनी 2014 नंतर राजकारण या विषयात बीएची पदवी मिळवली

वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपावली

 त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. 

1986 साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना 40 दिवसांचा कारावास झाला होता. त्यावेळी त्यांना बेल्लारी येथील तुरुंगात ठेवण्यात आलं

1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले, त्यानंतर त्यांच्यावर गटनेतेपदाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली. 

ते 2004 साली पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर ते 2009, 20014, 20019 मध्ये विजयी झाले. 

2022 मध्ये काही कारणांमुळे त्यांनी शिवसेनेतून उठाव केला, त्यांना पक्षातील चाळीस आमदारांनी पाठिंबा दिला. याच पाठिंब्याच्या जोरावर ते मुख्यमंत्री झाले.