महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता किती?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केलं आहे.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 

परंतु दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. 

 दरम्यान महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. 

अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्याविरोधात गेल्यास सरकारची डोकेदुखी वाढू शकते. 

मात्र राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पहाता, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.

16 आमदार जरी अपात्र ठरले तरी देखील शिंदे गटाचे इतर आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा जाणार का? हा खरा प्रश्न आहे.

निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे इतर राजकीय पक्ष देखील राष्ट्रपती राजवटीबाबत फारसे उत्सुक नसल्याचं चित्र आहे. 

 एकंदरीत परिस्थिती पहाता शिंदे, फडणवीस सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्याचीच शक्यता अधिक आहे.