शाईन मुंबई! जागतिक पर्यटन दिनी अमृता फडणवीसांची क्लीनअप मोहीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमळे कायम चर्चेत असतात. 

त्याचप्रमाणे अमृता फडणवीस यांचा सामाजिक कार्यातही मोठा हातभार असतो. 

आज जागतिक पर्यटन दिनी अमृता फडणवीसांनी क्लीनअप मोहिमेत सहभाग घेतला. 

रस्ते, नद्या, महासागर, राष्ट्रीय वारसा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. 

ही मोहीम गेट ऑफ इंडिया येथे राबवण्यात आली होती. ‘शाईन मुंबई ’हेरिटेज क्लीनअप असं या मोहिमेचं नावं होतं. 

स्वच्छता मोहिमेत भाग घेत अमृता फडणवीसांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. 

या आधीही अमृता यांनी गणपतीच्या दिवसात बीच क्लीन अप ड्राईव्ह मोहिमेतही सहभाग घेतला होता. 

'ना गंदगी करूँगी,ना करने दूँगी' अशी शप्पथ अमृता यांनी यावेळी घेतली होती. 

अमृता फडणवीस नेहमीच अशा कार्यक्रमात सहभागी होऊन इतरांचा उत्साह वाढवत असतात.