मालिकेचं शुटींग पाहण्यासाठी अंबाबाईच्या मंदिरात गर्दी! 

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या नवरात्री विशेष भागाचं चित्रीकरण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात पार पाडलं. 

गौरी-जयदीप आई बाबा होणार असताना अचानक गौरीचा अपघात झाला.

गौरी आणि तिचं बाळ सध्या मृत्यूच्या दारात आहे.

दोघांचाही जीव वाचावा यासाठी जयदीप कोल्हापुरच्या अंबाबाईला साकडं घालणार आहे.

अंबाबाईला लोटांगण घालत आणि मंदिराची साफसफाई करत जयदीप देवीची भेट घेणार आहे. 

जयदीप म्हणजेच अभिनेता  मंदार जाधवने या एपिसोडसाठी विशेष मेहनत घेतली आहे.

जयदीपला पाहण्यासाठी कोल्हापूरच्या मंदिरात चाहत्यांनी गर्दी केली होती. 

या भागात देवीच्या रुपात अभिनेत्री निशा परुळेकरचही दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.

जयदीपची ही खडतर तपश्चर्या पूर्णत्वास जाऊन गौरी आणि तिचं बाळ सुखरुप घरी परतणार का? तुम्हाला काय वाटतं?