अखेर प्रसाद ओकच्या नव्या सिनेमाची घोषणा!

अभिनेता प्रसाद ओक अभिनीत 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा चांगलाच गाजला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह लाखो प्रेक्षकांनी प्रसादचं आणि सिनेमाचं कौतुक केलं.

धर्मवीरआधी प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' सिनेमानं देखील नवा
रेकॉर्ड बनवला. 

धर्मवीरनंतर 'धर्मवीर 2' ची चर्चा रंगली आहे. प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

धर्मवीर 2 ची चर्चा असताना प्रसादच्या 'सुटका' सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. 

सिनेमात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे, ओमकार राऊत प्रमुख भूमिकेत आहेत. 

यानिमित्तानं स्वप्निल आणि प्रार्थनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. 

एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच दिवशी 7 मराठी सिनेमांची घोषणा आली. 

प्रसादच्या नव्या सिनेमाविषयी तुम्हाला काय वाटतं?