साडीमध्ये नोरा फतेहीचा देसी गर्ल लूक!

नोरा फतेही ग्लॅमरस लुक्ससाठी ओळखली जाते.

नोरा तिच्या डान्स मूव्ह आणि स्टायलिश लूकने सोशल मीडियावर कायम चर्चेत राहते.

नुकताच नोरा फतेहीने तिचा देसी लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

गोल्डन कलरच्या साडीमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नोराने सोनेरी रंगाच्या साडीसोबत चांदीचे झुमके, चोकर आणि अंगठी घातली आहे.

नोराने हलक्या तपकिरी लिपस्टिक आणि गडद तपकिरी आय शॅडोसह तिचा लूक पूर्ण केला.

नोराने स्ट्रॅपी स्लीव्हलेस गोल्डन ब्लाउजसोबत साडी नेसली आहे. तिचे मोकळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

 नोराच्या या फोटोंवर जवळपास 4 लाख लाईक्स आले आहेत.