नऊवारीवर रॅप!
'मराठी पोरगी'ने अख्ख्या देशाला लावलंय वेड
नाकात नथ, नऊवारी साडी नेसलेल्या या महाराष्ट्राच्या लेकीने अख्ख्या देशाला वेड लावलंय.
नऊवारीत ठसकेबाज लावणी पाहिली असेल पण नऊवारी नेसून नऊवारीचा रॅप तुम्ही कधी ऐकला नसेल.
अख्ख्या देशाला या रॅपने वेड लावणाऱ्या, आपल्या तालावर नाचवणाऱ्या या तरुणीचं नाव आहे आर्या जाधव.
आर्या ही रॅप गायक आहे.
तिनं हसल 2.o या शोमध्ये
स्पर्धक म्हणून भाग घेतलाय.
अमरावतीच्या या लेकीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
हसल 2.o हा शो रॅप गायकांसाठी आहे. ज्यात आर्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
रॅप गायल्यानंतर परीक्षकांनी आर्याचं भरभरून कौतुक केलं.
मराठी मुलीचा हा रॅप ऐकून तुम्हालाही अक्षरशः संचारल्यासारखंच झालं असेल.
सोशल मीडियावर आर्याचे 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
नाकात नथ घालून स्टायलिश आऊटफिटमध्ये आर्या फोटोशूट करत असते.