नवरात्रीत रसिकाचं खास 'इरकल' कलेक्शन!

प्रेक्षकांची लाडकी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील.

रसिकानं यंदा नवरात्रीसाठी खास इरकल साड्यांचं कलेक्शन केलं आहे. 

प्रत्येक दिवशी रसिका नव्या रंगासह नवी इरकल साडी नेसून चाहत्यांसमोर येत आहे. 

अभिनेत्रीची दरदिवशीची साडी आधीपेक्षा वेगळी आहे. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नेसलेली पांढरी साडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. 

नवरात्रीचा दुसरा रंग लाल. हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन करत रसिकानं लुक बनवला होता. 

तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाच्या साडीत रसिकाचं सौंदर्य चांगलंच खुलून आलं होतं. 

नवरात्रीच्या चौथ्या दिवशीची साडीही विशेष आहे. 

साडीच्या पदरावरील देवीचं चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.