क्रांती बनली 'दॅट हॅप्पी गर्ल'

आणखी पाहा...!

प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. 

अनेक रिल्स व्हिडीओ क्रांती शेअर करत असते. 

अभिनेत्री क्रांती आता निर्माती झाली आहे. 

'दॅट हॅप्पी गर्ल' ही क्रांतीची नवी ओळख सर्वांसमोर येणार आहे. 

 'दॅट हॅप्पी गर्ल' हे क्रांतीच्या नव्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. 

 'दॅट हॅप्पी गर्ल' आणि प्लानेट मराठी मिळून पहिला रिएलिटी शो सुरू करणार आहेत. 

नुकतीच क्रांतीनं ही घोषणा केली आहे. 

यानिमित्ताने नवोदितांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे,असं क्रांती म्हणाली.

क्रांतीची निर्मिती असलेला 'रेनबो' हा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

आधी देखील क्रांतीनं 'काकण' या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

सोशल मीडियावर येणारे क्रांती व्हिडीओ मात्र नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.