स्पृहा जोशी पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत

अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका, युट्युबर अशा अनेक भूमिकांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी.

स्पृहाने दमदार अभिनयाने आणि निखळ हास्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. 

आपल्या मेहनतीच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

स्पृहा लवकरच एका नव्या मालिकेत, नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

स्पृहा लवकरच झी मराठी वाहिनीवरील 'लोकमान्य' मालिकेत दिसणार आहे. 

स्पृहा पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. 

चाहते स्पृहाला पुन्हा  ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून स्पृहा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये.

बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवी कोरी मालिका असणार आहे.